Saturday, August 27, 2016

सकाळच्या स्वप्नात मी बाप माझा शोधला
डोंगराएवढ्या आसवांसोबत जीव त्यानं टांगला

माय माझी स्तब्धली बापात माझ्या गुंतली
त्याला आठवताना तिचा किनारा वाहला

बाप माझा जगला कि नुसताच गेला पोसला
चांदण्यांच्या गर्दीत या हसताना त्याला पहिला

कन्हैया माटोले
(८२७५९४४९९५)